Fri. Nov 15th, 2024
  • जागतिक पातळीवरील आघाडीच्या पाच वेयरेबल कंपन्यांपैकी इमॅजिन मार्केटिंग ही मागील वर्षीच्या तुलनेत +७६.६% सकारात्मक वृद्धीसह २०२२ च्या दुसऱ्या तिमाहीतील सर्वाधिक वेगाने वाढत असलेली कंपनी आहे.
    • जुलै २०२२ मध्ये ३१% बाजारपेठ हिस्सेदारी काबीज करून इमॅजिन मार्केटिंगने भारतातील वेयरेबल्सच्या बाजारपेठेत आपले नेतृत्वस्थान अधिक मजबूत केले आहे.राष्ट्रीय, २२ सप्टेंबर, २०२२
    इमॅजिन मार्केटिंग म्हणजे बोट – boAt ब्रँडच्या प्रमुख कंपनीने संपूर्ण जगभरात पाचवे स्थान मिळवले आहे. इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशन (आयडीसी) वर्ल्डवाईड क्वार्टरली वेयरेबल डिव्हाईस ट्रॅकर क्यू२सीवाय२०२२ या आघाडीच्या मार्केट रिसर्च व ऍडव्हायजरी फर्मने इमॅजिन मार्केटिंगला हे रँकिंग दिले आहे.  आयडीसी इंडिया मंथली वेयरेबल डिव्हाईस ट्रॅकर ऑगस्ट २०२२ नुसार सलग तिसऱ्या वर्षी (२०२०, २०२१, २०२२) इमॅजिन मार्केटिंगने भारतातील एकंदरीत वेयरेबल उद्योगक्षेत्रात आपले नेतृत्वस्थान कायम राखले आहे. उत्तम प्रकारे डिझाईन करण्यात आलेल्या, स्वदेशी आणि अनोख्या लाइफस्टाइलला अनुरूप उत्पादनांचा विशाल पोर्टफोलिओ या ब्रँडने अतिशय आकर्षक किमतींना उपलब्ध करवून दिला आहे.

    जुलै २०२२ च्या आकडेवारीनुसार ४०% पेक्षा जास्त हिस्सेदारी मिळवत इमॅजिन मार्केटिंगने टीडब्ल्यूएस विभागातही नेतृत्वस्थान मिळवले आहे.  उपलब्धता, परवडण्याजोग्या किमती, अधिक चांगली वैशिष्ट्ये आणि एएनसीसारख्या उपयुक्तता, नाविन्यपूर्ण डिझाइन्स, गेमिंगसाठी लो-लॅटेन्सी मोड यासारख्या अनेक गोष्टी इमॅजिन मार्केटिंगच्या लक्षणीय वृद्धीला कारणीभूत ठरल्या आहेत.  इमॅजिन मार्केटिंगच्या या वाढीमध्ये सर्वाधिक योगदान वॉच-बेस्ड वेयरेबल्स सर्वाधिक वेगाने विकसित होणारा विभाग ठरला आहे, मागील वर्षीपेक्षा यंदा >१४५% वृद्धी नोंदवण्यात आली आहे (२०२१ व २०२२ च्या सहामाहीतील तुलना). परवडण्याजोग्या किमतीच्या बरोबरीनेच ब्ल्यूटूथ कॉलिंग, अधिक मोठा स्क्रीन आकार आणि अमोल्ड डिस्प्ले यासारखी वैशिष्ट्ये पहिल्यांदाच वेयरेबल्स वापरणाऱ्यांना तसेच अपग्रेडर्सना खूपच आकर्षित करत आहेत.

    फेस्टिव्ह सेल्स सीझनमध्ये उत्तम प्रतिसाद मिळेल अशी आशा इमॅजिन मार्केटिंगने व्यक्त केली आहे.  ग्राहकांची सकारात्मकता, परवडण्याजोग्या किमती आणि अधिक चांगली वैशिष्ट्ये यामुळे इमॅजिन मार्केटिंगच्या विशाल पोर्टफोलिओची मागणी वाढेल असे कंपनीचे अनुमान आहे. बोटची स्मार्टवॉचेस आणि टीडब्ल्यूएस डिव्हायसेस सणासुदीच्या भेट म्हणून देण्यासाठी सर्वोत्कृष्ट मानली जातात. ‘मेक इन इंडिया’ मोहीम जास्तीत जास्त लोकप्रिय होत आहे, त्यामुळे ब्रँड अधिक जास्त वेगाने आणि कमीत कमी किमतींना उत्पादने सादर करू शकत आहे. आपल्या मेक इन इंडिया धोरणांतर्गत आर्थिक वर्ष २०२३ च्या पहिल्या सहामाहीमध्ये ६० लाख युनिट्सचे उत्पादन करण्याची कंपनीची योजना आहे.
    कंपनीने आपले ओम्नीचॅनेल धोरण अधिक मजबूत केले असून ऍमेझॉन इंडिया, फ्लिपकार्ट, मिंत्रा, पेटीएम आणि इतर अनेक मार्केटप्लेसेसमध्ये या कंपनीची उत्पादने खरेदी करता येतात.  विजय सेल्स, क्रोमा, रिलायन्स डिजिटल आणि इतर अनेक २०००० हुन जास्त स्टोर्समध्ये हा ब्रँड उपलब्ध आहे.  त्यांच्या स्वतःच्या https://www.boat-lifestyle.com/यावेबसाईटवर देखील ग्राहक ब्रँडच्या विशाल पोर्टफोलिओचा अनुभव घेऊ शकतात.
    बोटचे सह-संस्थापक व सीएमओ श्री. अमन गुप्ता म्हणाले, “डिझाईन, नावीन्य आणि ग्राहककेंद्री धोरण ही आमच्या व्यवसायाची मूलतत्त्वे आहेत. वेगवान वाटचाल, नावीन्यपूर्णतेचे वेगवान चक्र आणि आमच्या बोटहेड्सचे सतत ऐकणे यामुळे आमच्या ब्रँडला हे यश मिळत आहे. गेल्या अनेक वर्षात ग्राहकांनी आमच्यावर विश्वास ठेवला आहे आणि ते आम्हाला सतत साथ देत आहेत यामुळे आम्ही भारावून गेलो आहोत आणि आम्ही त्यांचे आभारी आहोत. देशात विकसित होणारे ब्रँड जगभरात स्वीकारले जात असल्याचे यावरून सिद्ध होत असल्याने सर्व भारतीयांसाठी ही अभिमानास्पद बाब आहे. आपल्या सरकारच्या सहयोगाने आम्ही एक ग्लोबल लाइफस्टाइल ब्रँड म्हणून नावारूपाला येऊ असा आम्हाला विश्वास वाटतो. बोटमध्ये आम्ही मिलेनियल्सच्या गरजा, आवडीनिवडी समजून घेतो आणि बोटहेड्सच्या कम्युनिटीच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी चांगले जे-जे करता येईल ते आम्ही करत राहू.”
    २०२२ आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीपासून रॉकर्ज, बासहेड्स आणि एअरडोप्स उत्पादन श्रेणी आणि ऍक्सेसरीज (केबल्स व पॉवर बॅंक्स) यातील अनेक बोट उत्पादने भारतात तयार केली जात आहेत.  बोट बासहेड्स १००, बासहेड्स १९२, बासहेड्स २२५, रॉकर्ज २५५ प्रो, रॉकर्ज २३५व्ही२, एअरडोप्स १३१, एअरडोप्स १०१, एअरडोप्स ४४१, पॉवर बँक, चार्जिंग केबल आणि पॉवर ब्रिक्स ही सध्या बोटच्या “मेक इन इंडिया” उपक्रमांतर्गत उपलब्ध असलेली उत्पादने आहेत.

भारतासाठी अभिमानाचा क्षण – इमॅजिन मार्केटिंगने (बोटची – boAt प्रमुख कंपनी) जागतिक पातळीवरील आघाडीच्या पाच वेयरेबल कंपन्यांमधील आपले स्थान गेल्या सात तिमाहींमध्ये कायम राखले

By admin