Thu. Dec 19th, 2024

बॉलिवूडमध्ये करीना कपूर खानला झिरो फिगर नायिका म्हटले जात असे. आताही स्वतःचे शरीर फिट आणि सुडौल ठेवण्यासाठी करीना नेहमीच व्यायाम करीत असते आणि त्यावर भरही देत असते. मात्र शरीर सुडौल ठेवण्यासाठी निरोगी झोपेचीही प्रचंड आवश्यकता असते. केवळ करीनाच नव्हे तर तिचे संपूर्ण कुटुंब सक्रिय, उत्साही आणि निरोगी जीवनशैलीसाठी शांत झोप घेत असते.

दिवसाच्या झोपेपेक्षा रात्रीची झोप महत्त्वाची असते. रात्री चांगली झोप झाल्यास शरीर निरोगी राहते, वजन कमी होते, पोटाची चरबी कमी होते आणि त्यामुळे आपण फिट राहतो असे करीना कपूर खान म्हणते.

स्प्रिंगफिट मॅट्रेसेसचे कार्यकारी संचालक नितीन गुप्ता  म्हणतात-  “स्प्रिंगफिट ही अशा लोकांसाठी एक स्पष्ट निवड आहे जे निरोगी आणि सक्रिय जीवनशैलीसाठी दीर्घकाळ टिकेल अशा विश्वासार्ह मॅट्रेसेसच्या शोधात आहेत.

रात्री मिळालेली शांत झोप तुम्हाला दिवसभरातील सर्व कामांसाठी ऊर्जा देते, मन ताजेतवाने करते, लठ्ठपणा दूर ठेवते, साखरेची पातळी राखते आणि विशेष म्हणजे मानसिक आरोग्य सुनिश्चित करते. असे अनेक अभ्यासातून सिद्ध झालेले आहे. आणि येथेच स्प्रिंगफिटचे नाव  पुढे  येते. याचे कारण म्हणजे स्प्रिंगफिट मॅट्रेस उत्तम टेक्निक, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करून उत्तम प्रकारे तयार केलेले आहे. स्प्रिंगफिटला याचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. उच्च-गुणवत्ता आणि कारागिरीने स्प्रिंगफिटचे ग्राहकांच्या गरजेनुसार उत्कृष्टपणे डिझाइन केलेले असते जे अद्वितीय आहे. स्प्रिंगफिट मॅट्रेस तयार करताना ग्राहकाच्या गरजेनुसार आणि त्यांच्या वैयक्तिक आवडी लक्षात घेऊन तयार केलेले असते ज्यामुळे ग्राहकांना शांत आणि आरामशीर झोपेचा अनुभव मिळतो.

भारतातील लक्झरी मॅट्रेस निर्माता म्हणून आम्ही गेल्या ४० वर्षांपासून काम करीत आहोत. ग्राहकांना झोपेचे परिपूर्ण समाधान देण्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करीत आहोत. आम्ही लोकांच्या झोपण्याच्या सवयींच्या संशोधनात सतत गुंतवणूक करतो, आमच्या उत्पादनांमध्ये नवीनतम वैज्ञानिक विकास आणि तांत्रिक नवकल्पना तयार करतो.

आम्हाला आमच्या ३० एकर क्षेत्रामध्ये पसरलेल्या जागतिक दर्जाच्या ५ उत्पादन संयंत्रांच्या एकत्रित प्लांटचा अभिमान आहे, आमच्या या प्लांटची एकूण क्षमता वर्षाला ४ लाख मॅट्रेस तयार करण्याची आहे. स्प्रिंगफिटच्या सर्व गाद्या आणि त्यातील मुख्य घटक जसे की फोम, स्प्रिंग इत्यादी आम्ही स्वतः बनवतो. स्प्रिंगफिटचे संपूर्ण भारतभर विस्तृत वितरण नेटवर्क आणि किरकोळ विक्री केंद्रे आहेत. देशातील २३ राज्यांमध्ये स्प्रिंगफिट उपलब्ध असून यासाठी देशभरातील १ हजारहून अधिक किरकोळ विक्रेते आणि ९० विशेष ब्रँड स्टोअर्सचे जाळे उभारलेले आहे. संपूर्ण देशभरात आमचा ब्रँड असल्याने आम्हाला ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून करीना कपूर खान अत्यंत योग्य वाटल्या. कारण करीना आणि आमच्या ब्रँडचा विचार एकच आहे आणि तो म्हणजे शांत झोप.”

करीना कपूरनेही स्प्रिंगफिटसोबत जोडले जात असल्याबाबत आनंद व्यक्त केला. करीना म्हणते, “जेव्हा तुम्ही उत्कृष्टरित्या डिझाइन केलेल्या आलिशान मॅट्रेसवर झोपता तेव्हा शरीराला एक वेगळी संवेदना आणि मनाला एक वेगळा अनुभव मिळतो. हो की नाही? आणि हा आनंद स्प्रिंगफिट मॅट्रेस देते आणि म्हणूनच मी स्प्रिंगफिटसोबत जोडण्यास तयार झाले. स्प्रिंगफिट मॅट्रेस खरोखरच आराम आणि लक्झरी यांचा मेळ घालते आणि झोपेचा खराखुरा आनंद देते. माझ्या पॉवर नॅप्स आणि शांत झोपेचा नवा अर्थ स्प्रिंगफिट आहे त्यामुळे स्प्रिंगफिटला धन्यवाद!”

करीना कपूरला एकदा झोपताना कोणत्या तीन गोष्टी घेते असे विचारले असता तिने सांगितले होते, “वाइनची बाटली, पायजमा आणि सैफ अली खान.”

आणि आता असे दिसते की तिच्या या तीन गोष्टींचा आनंद आणखी द्विगुणित करण्यासाठी ती स्प्रिंगफिट मॅट्रेस झोपण्यासाठी वापरू लागली आहे.

करीना कपूरच्या उत्साह आणि उर्जेचे गुपित- स्प्रिंगफिट मॅट्रेस!

By admin