Thu. Dec 19th, 2024

भारतातील प्रख्यात बॉक्सर मेरी कॉमने मुंबईतील द अॅक्टर प्रीपेअर्स येथे ‘शिव शास्त्री बल्बोआ’ चित्रपटाचे पोस्टर केले लाँच. या चित्रपटात अनुपम खेर, नीना गुप्ता, जुगल हंसराज, नर्गिस फाखरी, शरीब हाश्मी असे नामवंत कलाकार असून हा एका सामान्य माणसाच्या असामान्य साहसाचा प्रेरणादायी चित्रपट आहे.

अनुपम खेर आणि मेरी कोम  दोघेही एकमेकांचे उत्कट प्रशंसक आहेत. दोघेही  अभिनय आणि बॉक्सिंगबद्दल बोलले. मेरी कोमने अनुपम खेर यांना बॉक्सिंगमधील काही टिप्स शिकवल्या. त्यानंतर या दोघांची रिंगमध्ये मॉक मॅचही झाली.

यावेळी बोलताना अनुपम खेर म्हणाले, “मला माझ्या चित्रपटाचे पोस्टर खेळाशी संबंधित विशेषतः बॉक्सिंगमध्ये राष्ट्रीय आयकॉन असलेल्या  खेळाडूकडून लाँच करायचे होते. मी जेव्ही मेरी कोमला याबाबत विचारले तेव्हा ती लगेच तयार झाली. मेरी कोम खूप प्रेमळ आहे. तिची स्तुती करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. तिला वेगवान खेळ आवडतात पण जाहिरात आणि चित्रपट आवडत नाहीत. ती भारताचा गौरव आहे.”

अनुपम खेर म्हणतात, मेरी कोमचा वैयक्तिक साधेपणा, तिचे हास्य आणि तिच्या निर्विवाद नम्रपणामुळे मी स्तब्ध झालो आहे. “जे मोठ्याने हसतात ते नेहमी चांगल्या मनाचे असतात. मी मेरी कोमची नेहमीच प्रशंसा करीत आलो आहे, पण आज तिच्या नम्रतेने मी भारावून गेलो आहे. ती खरी चॅम्पियन आहे.”

अनुपम खेर पुढे म्हणाले, “शिव शास्त्री बालबोआ हा एक वेगळा चित्रपट आहे, अमेरिकेत भेटणाऱ्या दोन अनोळखी व्यक्तींची आणि त्यांच्या आयुष्याला नंतर मिळणाऱ्या नव्या वळणाची कथा यात आहे.  हा एक प्रेरक प्रवास आहे.”

अनुपम खेर पुढे म्हणतात, “नीना गुप्ता एक उत्तम अभिनेत्री तर आहेच ती एक चांगली व्यक्तीही आहे. चित्रपटात शारिब हाश्मी एका चांगल्या भूमिकेत दिसणार असून जुगल हंसराजही बर्या च दिवसांनी चित्रपटात दिसणार आहे. नर्गिस फाखरीही एका अत्यंत वेगळ्या आणि चांगल्या भूमिकेत या चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अजयन वेणुगोपालन यांनी केले आहे. त्यांनी यापूर्वी ‘मेट्रो पार्क’ या मालिकेचे दिग्दर्शन केलेले आहे.”

यूएफआय मोशन पिक्चर्स, अनुपम खेर स्टुडिओ आणि तरुण राठी प्रस्तुत शिव शास्त्री बाल्बोआ चित्रपटाचे निर्माते आहेत किशोर वरिएथ आहेत, दिग्दर्शन अजयन वेणुगोपालन यांनी केले असून आशुतोष बाजपेयी या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.

  

प्रख्यात महिला बॉक्सर मेरी कोमने केले अनुपम खेर यांच्या ‘शिव शास्त्री बाल्बोआ’ चित्रपटाचे पोस्टर लाँच

By admin