Wed. Jan 22nd, 2025

ब्रिटीश भारतातून गेल्यानंतर भारतामध्ये अनेक महत्वपूर्ण बदल झाले, परंतु शाळांमधील कला शिक्षण मात्र त्याच पारंपरिक ब्रिटिश राजवटीतीलच राहिले असे म्हटले तर चूक ठरणार नाही. भारतातील शाळांमध्ये कला प्रशिक्षण पाश्चात्य पद्धतीने शिकवले जात असतानाही, गेल्या शतकभरात भारतातील अनेक चित्रकारांनी स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले.

प्रख्यात चित्रकार अनिता गोयल याच पाश्चात्य शिक्षण पद्धतीला आव्हान दे्ण्यासाठी स्वतःचे सोलो चित्रप्रदर्शन ‘अवतरण’ भरवत आहेत. ४ फेब्रुवारी रोजी अनावरण होणाऱ्या या प्रदर्शनातून अनिता गोयल भारतीय शैक्षणिक संस्थांमध्ये प्रचलित कलात्मक नियमांमध्ये क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न करणार आहेत.

अनिता गोयल आपल्या प्रदर्शनाबाबत बोलताना म्हणाल्या, “शाळांमधील कला शिक्षण पद्धत कलाकारांची सर्जनशीलता दाबून ठेवत अविभाज्य कलाकृतींना कायम ठेवते, हा एकजीनसीपणा तोडून समकालीन भारतीय कलेची नव्याने व्याख्या करणे हे माझे उद्दिष्ट आहे.”

अनिता गोयल यांची कलात्मक दृष्टी परंपरागत सीमा ओलांडणारी आहे. त्या त्यांची निर्मिती साचेबद्ध कॅनव्हासच्या मर्यादेपलीकडे विस्तारणारी आहे. त्या पेंटिंगच्या आधुनिक साधनांचा अवलंब करतात, विशेषतः पेंटिंग चाकूचा वापर त्या खूपच उत्कृष्टपणे करतात. चित्रकलेने विशिष्ट संदेश किंवा कथन व्यक्त करण्याऐवजी फॉर्म आणि माध्यमाच्या परस्परसंवादाला प्राधान्य दिले पाहिजे. असे अनिता गोयल यांच मत आहे.

अनिता गोयल यांच्या कल्पनेच्या केंद्रस्थानी फॉर्म, रंग आणि पोत यांचा अनोखा मिलाफ करण्यात आलेला असतो. त्यांचे प्रत्येक चित्र कलेच्या आस्वादकांना चित्र सखोल जाणून घेण्यास प्रेरित करतो.  अनिता गोयल यांचे मागील चित्र प्रदर्शन उडान ला पुढे घेऊन जाणारे अवतरण चित्र प्रदर्शन आहे.  कलादर्दींनी येऊन त्यांच्या या नव्या  दृष्टीकोनाची माहिती घ्यावी असा त्यांचा प्रयत्न आहे. आणि त्यामुळेच त्यांच्या कला प्रदर्शनाला कलादर्दींनी यावे असे आवाहन अनिता गोयल करीत आहेत.

वेगवेगळ्या जाडीचे आणि आकाराचे कॅनव्हास अनिता गोयल निवडतात आणि त्यातून सपाट पृष्ठभागावर त्रिमितीय कलाकृती निर्माण करतात. त्यांच्या कलाकृतीवर चाकूने रंग भरलेले असतात. त्यामुळेच कलादर्दींना त्यांचे चित्र अनेक स्तरांवर असल्याचे भासते.

वरळी येथील जोलीज येथे 4 फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता अवतरण या चित्र प्रदर्शनाला सुरुवात होणार असून हे चित्र प्रदर्शन येण्यासाठी अनिता गोयल सगळ्यांना आमंत्रित करीत आहेत. कलादर्दींना समकालीन भारतीय कलेच्या क्षेत्रातून परिवर्तनशील प्रवासाचा अनुभव देणारे असे हे चित्र प्रदर्शन असणार आहे.

अनिता गोयल यांचे अवतरण प्रदर्शन 4 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजल्यापासून जोलीज, बिर्ला सेंच्युरियन, पांडुरंग बुधकर मार्ग, सेंच्युरी मिल्स कंपाउंड, वरळी, मुंबई, महाराष्ट्र 400030 येथे सुरू होणार आहे.

 

प्रख्यात चित्रकार अनिता गोयल यांचा सोलो शो ‘अवतरण’ ४ फेब्रुवारीपासून

By admin